You are currently viewing महाराष्ट्र भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांचा वाढदिवस…

महाराष्ट्र भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांचा वाढदिवस…

संपादकीय

माजी खासदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांचा आज वाढदिवस. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण खासदार म्हणून देशाच्या संसदेत गेलेले माजी खासदार निलेश राणे म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत. आपल्या बेधडक वक्तव्यामुळे निलेश राणे नेहमीच चर्चेत असतात. कोकणातील प्रश्नांची उत्तम जाण असलेले निलेश राणे गावागावात पोचले आहेत. गावागावातील कार्यकर्त्यांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे, त्यामुळे निलेश राणे दौऱ्यावर आले की त्यांच्या भोवती तरुण कार्यकर्त्यांचा सर्वात जास्त गोतावळा असतो.
आपल्यावर प्रेम करणाऱ्या नेत्यांच्याच नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीला देखील दिवसारात्री कधीही धावून जाण्याची निलेश राणे यांची वृत्ती, त्यामुळे त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास देखील जास्त. कोकणातील प्रश्न त्यांनी हिरहिरीने संसदेत मांडून अनेक प्रश्नांना वाचा फोडली. कोकणाच्या विकासासाठी नेहमीच ते अग्रेसर असतात. संसदेत अभ्यासू भाषण करत कोकणातील सर्वात जास्त प्रश्न संसदेत मांडण्यात ते आघाडीवर होते. वडील खासदार नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात तर ते यशस्वी झालेतच परंतु समाजकारणातही ते पुढे असतात.
निलेश राणे यांच्या जनसंपर्क दांडगा आहे, तसेच पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर देखील त्यांना मान आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोणतेही काम वरिष्ठ पातळीवरून करून घेण्याची त्यांची ताकद आहे. मध्यंतरीच्या काळात राजकीय उलथापालथ झाली त्यात त्यांना भले हार पत्करावी लागली तरी समाजकार्यात ते कधीही मागे राहिले नाहीत. जनतेने आजवर दिलेल्या प्रेमाखातर ते सदैव जनतेसाठी लढायला तयार असतात. त्यांच्या अभ्यासू आणि कणखर भूमिकेमुळे पक्षाच्या दिल्लीच्या मुख्यालयातून त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीचे महत्व लक्षात घेत त्यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील वाटचालीत आपला महत्वपूर्ण वाटा उचलण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात त्यांना यापेक्षा मोठी जबाबदारी मिळो आणि राजकीय वाटचाल यशस्वी होवो अशाच संवाद मिडियाकडून शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा