दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा करत पुरवठा अधिकारी दिपाली गोटे यांचा सामाजिक संदेश
साहस प्रतिष्ठानच्या मुलांना शालेय साहित्य व भेटवस्तूंचे वाटप; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उपक्रमांना नेहमीच सहकार्य
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी दिपाली गोटे यांनी आपला वाढदिवस साहस प्रतिष्ठानमधील दिव्यांग मुलांसोबत साजरा करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. यावेळी त्यांनी मुलांना शालेय उपयोगी वस्तू व भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.
दिपाली गोटे या सामाजिक कार्याची आवड असलेल्या असून, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याने प्रेरित होऊन संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेतात. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता दिव्यांग मुलांसोबत आनंद वाटून घेण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव, रूपा मुद्राळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी नंदकिशोर गंगाराम कोंडीये, शिक्षिका द्रोपती राऊळ, विदिशा सावंत, पालक तनया भोगण, गुंजन गावडे व सोनम जाधव उपस्थित होते.
