You are currently viewing वनहरिणी

वनहरिणी

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*

 

वनहरिणी

८ ८ ८ ८

 

प्रेमाने माणसे घराला, नीट जपाया शिकविलेस तू

पण कोणी जर गैर वागले, थेट भिडाया शिकविलेस तू

 

प्रसंग सारे अवघड करुनी, कोंडी करण्या प्रयत्न करती

तरी यातुनी सहजपणाने छान सुटाया शिकविलेस तू

 

गुन्हा नसे जर अपुला काही, सहन करावी का मनमानी

तिथल्या तिथेच चोखपणाने, उत्तर द्याया शिकविलेस तू

 

मऊ राहुनी कुठे चालते, जशास तसेच वागू आपण

लबाड स्वार्थी अशा जगाशी, तसे लढाया शिकविलेस तू

 

जीवनात या सर्व तऱ्हेचे अनुभव येती लोक भेटती,

त्याचप्रमाणे मृदु कठोर हे तसे बनाया शिकविलेस तू

 

आईची ही ज्ञान शिदोरी जन्मभरास्तव मला पुरेशी

बरा वाईट प्रसंग बघुनी, निर्णय घ्याया शिकविलेस तू

 

डॅा.शरयू शहा,मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा