सावंतवाडी नगराध्यक्ष… भाजपच्या यशाचे सारथी..

♦सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक खूपच चुरशीची झाली. कधी नव्हे ती भाजपाची सत्ता सावंतवाडी नगरपालिकेत आली आणि संजू परब हे नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले.

♦नितेश राणे यांचं योग्य नियोजन हे होतंच, परंतु प्रत्येक प्रभागातील नगरसेवक, कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न डावलून चालणार नाहीत. अपयशास शेकडो जबाबदार ठरवतात, परंतु यशास मात्र एकटाच…! असं म्हणून नक्कीच चालणार नाही, कारण जिथे आजपर्यंत यशाने हुलकावणी दिलेली होती, तिथे आज ते खेचून आणलं गेलं. आणि या यशाच्या रथाचा सारथी एक असेल, परंतु त्याची चाकं मात्र अनेक होती, ती रुतत, आपटत, आदळत यशाला घरापर्यंत घेऊन आली.

♦सावंतवाडीतील सर्व प्रभागांमध्ये मतांच्या आकड्यांवर नजर मारली असता, प्रभाग 8 जिथे भाजपाचे एकमेव नगरसेवक प्रतिनिधित्व करतात ते ऍड. परिमल नाईक, आणि प्रभाग 6 ते प्रतिनिधित्व करतात ते उदय नाईक. या दोन्ही नगरसेवकांनी आपापल्या वार्डात प्रभावी कामगिरी करून संजू परब यांना, पर्यायाने भाजपाला निर्णायक मताधिक्य मिळवून दिले, त्यामुळेच संजू परब यांचं आणि भाजपाचं सावंतवाडीत विजय मिळविण्याचं स्वप्न पूर्ण झालं. सावंतवाडीतील इतर प्रभागात भाजपा काहीवेळा पिछाडीवर होती, तर काही ठिकाणी तुल्यबळ लढत दिलेली. परंतु प्र.8 आणि प्र.6 मध्ये विजयी आघाडी मिळाली जी विरोधकांना चारिमूंड्या चित करणारी ठरली.

♦भाजपाच्या या यशात ऍड. परिमल नाईक आणि उदय नाईक हे विजयाचे शिल्पकार ठरले, त्यामुळेच माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी भाजपच्या गांधी चौक येथील मेळाव्यात यांचा आवर्जून उल्लेख केला, आणि या दोन्ही नगरसेवकांच्या कामगिरीसाठी त्यांचं कौतुक केलं. राणे यांनी त्यांच्या कामगिरीवर खुश होत परिमल नाईक यांची नगरपालिकेच्या क्रीडा व आरोग्य सभापतीपदी निवड केली. परिमल नाईक यांच्या निवडीमुळे त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखे वाटले.

♦परिमल नाईक हे भाजपाच्या गोटातील अत्यंत हुशार व अभ्यासू नगरसेवक आहेत. व्यवसायाने वकील असल्यामुळे ते प्रशासकीय बाबींमध्ये सुद्धा तरबेज आहेत. अभ्यासू वृत्तीमुळे सभागृहामध्ये ते सर्वच विषयांवर प्रभावीपणे मत मांडतात. त्यांच्या या हुशारी, आणि अभ्यासू व्यक्तित्वामुळे ते नक्कीच क्रीडा आणि आरोग्य सभापती म्हणून यशस्वी कार्य करतील यात शंकाच नाही…..!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + five =