You are currently viewing उपनिरीक्षक स्वाती बाबर यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

उपनिरीक्षक स्वाती बाबर यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

आरोंदा

आरोंदा हायस्कूल मध्ये सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक स्वाती यादव – बाबर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांनी सोशल मीडिया पासून म्हणजेच व्हॉटसअप, फेसबुक पासून लांब राहावे. तसेच बालकांनी लैंगिक शोषणापासून स्वतःची सुरक्षा करणे गरजेचे आहे. विनापरवाना वाहन चालवू नये.  तसेच विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे सत्य बोलावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आरोंदा हायस्कूल चे सचिव भाई देवूलकर, मुख्याध्यापक सिध्दार्थ तांबे, हवालदार विजय केरकर, तसेच आरोंदा सरपंच सुप्रिया पार्सेकर,  नाईक, गोविंद केरकर, स्मिताली नाईक, गीतांजली वेलणकर, जितेंद्र जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =