You are currently viewing मोती तलावात पून्हा एकदा पाणमाजरांचे दर्शन….

मोती तलावात पून्हा एकदा पाणमाजरांचे दर्शन….

सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात सायंकाळी पाण मांजरांचे दर्शन घडले. उप जिल्हा रुग्णालयाच्या समोरील भागात ४ ते ५ पाण मांजरे पाण्यात उड्या मारताना तेथे उपस्थित नागरिकांना दिसून आली. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पाण मांजरे दिसून आली होती. यापान मांजरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक यांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मांजरे सावंतवाडी तलावात दिसून आली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − two =