You are currently viewing पटनाट्यातून गणेश मूर्तीदान व संकलन जनजागृतीचा दिला संदेश

पटनाट्यातून गणेश मूर्तीदान व संकलन जनजागृतीचा दिला संदेश

पटनाट्यातून गणेश मूर्तीदान व संकलन जनजागृतीचा दिला संदेश

पिंपळे गुरव :

दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव येथील नदी घाटावर गणपती मूर्तीदान करा!असा संदेश पथनाट्यातून देऊन गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी जनजागृती करण्यात आली.
दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, प्रकाश घोरपडे,  बालकलाकार काव्या घोरपडे, क्रांती घोरपडे यांनी पथनाट्यात सहभाग घेतला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पालिका क्षेत्रात नदी घाटावर पाण्याचे हौद तयार केले आहेत. त्याच ठिकाणी गणेश विसर्जन सर्वांनी करावे हा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले- “श्री चे विसर्जन पाच, सात,दहा आणि अनंत चतुर्दशी या दिवशी मोठ्या प्रमाणात होते.गणेश मूर्तीदान केल्याने अथवा हौदात विसर्जन केल्याने नदी प्रदूषण निश्चित कमी होईल. काळानुरूप माणसाने बदलले पाहिजे.! निर्माल्य नदीत न टाकता महानगरपालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कुंडीत  टाकावे.! याबाबत जनतेचे प्रबोधन व्हावे म्हणून पथनाट्य घेण्यात आले आहे. यात गणपती मूर्तीचा पुनर्वापर व्हावा जेणेकरून पर्यावरणालाही हानी पोहोचणार नाही आणि प्रदूषण ही वाढणार नाही  तीन वर्षापासून दोन्ही संस्थाचे कार्यकर्ते गणेशमूर्ती संकलनाचे पटनाट्यातून प्रबोधनाचे काम पिं. चि.पालिकेसोबत करीत आहेत.”
दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले  “आपण सर्वांनी ज्ञान, विज्ञान, अध्यात्म याची सांगड घालून काम केले पाहिजे. आपण सारे शहरवासी नदीचे पाणी वापरतो, पितो. त्यामुळे नदी निर्मळ अन् स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे काम आहे. नदीत कोणीच निर्माल्य टाकू नये.
पिं.चिं. महानगरपालिके तर्फे तसेच शहरातील अनेक संस्थांच्या वतीने मूर्ती दान हा उपक्रम राबविला जात आहे. त्याचे महत्व विषद करण्यासाठी साध्या सोप्या भाषेत पथनाट्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.” आतापर्यंत पिंपळेगुरव च्या घाटावर  एकूण1500 मूर्तीचे संकलन करण्यात आले, यामध्ये शाडूच्या 400 तर पीओपीच्या 1100 मूर्तीचे संकलन करण्यात आले यामध्ये पालिका आरोग्य विभाग, दिलासा संस्था,मानवी हक्क संरक्षण आणि जागृती त्याचबरोबर बेसिक टीम यांनीही मूर्ती संकलनामध्ये सहभाग नोंदवला,उपस्थित नागरिकांना पर्यावरणाची शपथ दिली.
यावेळी महानगरपालिकेचे ड प्रभागाचे सहाय्यक  आरोग्य अधिकारी राजू साबळे म्हणाले या दोन्ही संस्थांचे सामाजिक काम खूप चांगले आहे. नेहमी महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या उपक्रमात या दोन्ही  संस्था सहभागी होत असतात  यापुढेही या संस्थांना आम्ही पालिकेच्या विविध उपक्रमात सामावून घेऊ”.

यावेळी ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजु साबळे ,मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड,गुणवंत कामगार प्रकाश घोरपडे, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे,आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार,बेसिक टिमचे झोनल प्रमुख सुखदेव लोखंडे,सागर पाटील,शिवाजी निम्हण, वार्ड इन्चार्ज विजय पेंडे,दीपक चौरे,काव्या घोरपडे, क्रांती घोरपडे उपस्थित होते. श्री गणेशाची विधिवत पूजा अन् आरती करून मुर्तिदान करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा