You are currently viewing खतरनाक लेडी डॉन अखेर जाळ्यात !!

खतरनाक लेडी डॉन अखेर जाळ्यात !!

“ड्रग्ज माफियांच्या दुनियेतील राणी”…

 

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीची ड्रग्ज विरोधात धडाकेबाज कारवाई अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर सुरुच आहे. या कारवाईत एनसीबीने आतापर्यंत अनेक मोठमोठ्या ड्रग्ज माफियांना जेरबंद केलं आहे. एनसीबीची ही कारवाई अद्यापही जारी आहे. एनसीबीने यावेळी आता मुंबईच्या डोंगरी भागातील खतरनाक लेडी डॉनला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून एनसीबी या लेडी डॉनच्या शोधात होते. अखेर तिला जेरबंद करण्यात एनसीबीला यश आलंय. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 6 एप्रिलला डोंगरी भागात छापा टाकून तिला ताब्यात घेतलं. ही लेडी डॉन मुंबईतील बार आणि डिस्को थेममध्ये ड्रग्जचा पुरवठा करायची.

या लेडी डॉनचं नाव इकरा अब्दुल गफ्फार कुरेशी असं असून ती 22 वर्षांची आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी बुधवारी तिच्या डोंगरी येथील घरावर छापा टाकला. यावेळी त्यांना 52 ग्रॅम मेफेडरोने ड्रग्ज मिळाले. हे ड्रग्ज त्यांनी जप्त केले. त्यानंतर त्यांनी तिला अटक केली.

विशेष म्हणजे इकरा कुरेशी ही एनसीबीच्या एका केसमध्ये वॉन्टेड लिस्टमध्ये होती, अशी माहिती एनसीबीचे चीफ समीर वानखेडे यांनी दिली. “एनसीबीने काही महिन्यां आधी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित ड्रग्ज माफिया चिंकू पठाण याला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान इकराचं नाव सांगितलं होतं. तेव्हापासून एनीसीबी इकराच्या शोधात होती”, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

समीर वानखेडे यांच्या माहितीनुसार इकरा ही ड्रग्ज माफियांच्या दुनियेतील राणी आहे. इकराने ड्रग्डच्या वितरणासाठी पाच ते सहा महिला ठेवल्या आहेत. याच महिलांच्यामार्फत ती मुंबईतील मोठमोठे बार आणि डिस्को थेकमध्ये ड्रग्जचा पुरवठा करते.

विशेष म्हणजे इकरा इतकी खतरनाक आहे की जी व्यक्ती तिच्याविरोधात जाते त्या व्यक्तीवर ती थेट हल्ला घडवून आणते. सध्या इकराचा नवरा आणि बॉयफ्रेंड दोघं जेलमध्ये आहेत. इकराला पाच वर्षांचा लहान मुलगा देखील आहे. इकरा ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे देखील ड्रग्जची डील करते. तिचा व्यवसाय मुंबईतील अनेक भागांमध्ये पसरला आहे, अशी माहिती वानखेडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 2 =