You are currently viewing तोंडवली-बावशीत महिलांचे आमरण उपोषण सुरू…

तोंडवली-बावशीत महिलांचे आमरण उपोषण सुरू…

स्वतंत्र रेशन दुकानाची मागणी ; महिला बचतगटाचा प्रस्ताव रद्द..

कणकवली

बावशी गावाला स्वतंत्र रेशन दुकान मिळावे या मागणीसाठी जय मल्‍हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या महिला आमरण उपोषणाला बसल्‍या आहेत. तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीच्या आवारात महिलांनी हे उपोषण सुरू केले आहे. पुरवठा विभागाने आमच्या महिला बचतगटाचा रेशनिंग दुकान परवाना रद्द केला असल्‍याचीही माहिती उपोषणकर्त्यां महिलांनी दिली.

तोंडवली-बावशी ग्रामपंचायत आवारात बचत गटाच्या प्रमुख स्नेहलता कांडर यांच्यासह अन्य महिलांनी उपोषण सुरू केले आहे. बावशी येथील जय मल्हार स्वयं सहायता महीला बचत गटामार्फत बावशी गावाला स्वतंत्र रेशनिंग दुकान मिळावे , यासाठी गेल्या वर्षी पुरवठा विभागाकडे प्रस्ताव सुपूर्द केला होता . मात्र या ठिकाणी जाण्यासाठी डांबरीकरण केलेला रस्ता नाही. तसेच इतर भागातील लोकांना दूर जावं लागणार म्हणून पुरवठा विभागाने दुसरी जागा दाखविण्यात सांगितले होते. परंतु या दोन ते तीन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला.

तसेच बचत गटाच्या महिलाही कोरोना बाधीत झाल्या होत्या. यामुळे आम्ही या काळात कुठे जावू शकलो नाही आणि याच कालावधीत पुरवठा विभागाने आमचा रेशनिंग दुकान प्रस्ताव रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले . या विरोधात आम्ही आमच्या तोंडवली बावशी ग्रामपंचायतीच्या आवारात जिल्हा पुरवठा विभागाच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याचे बचत गटाच्या प्रमुख स्नेहलता कांडर व इतर महीलांनी बोलताना सांगितले आहे. यावेळी तोंडवली आणि बावशी गावचे पोलिस पाटील, बावशी सरपंच मनाली गुरव, उपसरपंच अशोक बोभाटे, रविंद्र बोभाटे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर आदींनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 12 =