You are currently viewing कुडाळच्या गणेश घाटावर विसर्जन व्यवस्थेची नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची प्रत्यक्ष पाहणी
Oplus_16908288

कुडाळच्या गणेश घाटावर विसर्जन व्यवस्थेची नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची प्रत्यक्ष पाहणी

गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसह शिस्तबद्ध व शांततेत विसर्जन सोहळा पार पाडण्याच्या सूचना

कुडाळ / प्रतिनिधी : दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कुडाळ शहरातील गणेश घाटावर सुरू असलेल्या विसर्जन व्यवस्थेची नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी भंगसाळ नदीकिनारी गणेश घाटावरील परिस्थितीचा आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विसर्जन व्यवस्थेची माहिती घेतली.

गणेशभक्तांना विसर्जनावेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, सुरक्षितता अबाधित राहावी तसेच विसर्जन सोहळा शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावा, यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली.

यावेळी नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच कुडाळ शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून विसर्जनाचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

दरम्यान, कुडाळ शहरातील प्रत्येक गणेशभक्ताच्या श्रद्धेचा आणि भावनेचा आदर राखत प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने गणेश विसर्जनाचा हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. याचा मनापासून आनंद आहे, अशी भावना नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा