कै. विजय दादा जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २४ नोव्हेंबरला भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम
सावंतवाडीतील वैश्यवाडा येथील निवासस्थानी दुपारी १.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन
सावंतवाडी :
राष्ट्रीय कबड्डीपटू कैलासवासी विजय दादा जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सावंतवाडी येथील वैश्यवाडा परिसरातील त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला नातेवाईक, मित्रपरिवार, क्रीडाप्रेमी तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहून विजय दादा जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन जाधव कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
