You are currently viewing महामार्गावरील मृत म्हैस हटवून वाहतूक पोलिसांची तत्परता!

महामार्गावरील मृत म्हैस हटवून वाहतूक पोलिसांची तत्परता!

महामार्गावरील मृत म्हैस हटवून वाहतूक पोलिसांची तत्परता!

हुंबरट येथे रात्री अकराच्या सुमारास अज्ञात वाहनाची म्हशीला धडक; संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ

कणकवली :

हुंबरट येथे मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत म्हशीचा मृत्यू झाला. अपघातानंतर मृत म्हैस महामार्गावरच पडून राहिल्याने अन्य वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
याचदरम्यान नाकाबंदी संपवून परतणाऱ्या जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी आशिष जाधव, संदेश आबिटकर व श्री. पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी प्रसंगावधान राखत स्थानिक मरीये कुटुंबीयांच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने मृत म्हैस महामार्गाच्या मधोमध असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये हलवली. तसेच महामार्ग पोलीस व संबंधित यंत्रणेला माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा