You are currently viewing नाईक जिम अँड फिटनेस सेंटरच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन

नाईक जिम अँड फिटनेस सेंटरच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन

नाईक जिम अँड फिटनेस सेंटरच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन

वेंगुर्ले :

नाईक जिम अँड फिटनेस सेंटर, वेंगुर्ले कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग संस्था आणि रोहन काशीराम नाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट स्पर्धा २०२६ चे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे, पोलीस अधिकारी संजय साटम, नाईक जिम अँड फिटनेस सेंटर वेंगुर्ला, कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू तसेच स्पर्धेचे आयोजक उपस्थित होते. या स्पर्धेमुळे युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामाची आवड आणि क्रीडा क्षेत्रातील स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा