डॉ. ज्ञानेश्वर येवाळे यांची धारगळ आयुष रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सेवा
सावंतवाडी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे माजी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर येवाळे हे सेवानिवृत्तीनंतर गोवा शासनाच्या धारगळ (ता. पेडणे) येथील शासकीय आयुष रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत झाले आहेत. सिंधुदुर्ग, सावंतवाडी व दोडामार्ग परिसरातील महिलांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
गर्भवती मातांची तपासणी व प्रसूतीसह विविध उपचार मोफत
धारगळ येथील शासकीय आयुष रुग्णालयात डॉ. येवाळे यांच्याकडून गर्भवती मातांची तपासणी व प्रसूती तसेच गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसह विविध स्त्रीरोग उपचार करण्यात येणार आहेत. या सेवा शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
डॉ. येवाळे यांची रुग्णसेवा रविवार वगळता सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत उपलब्ध राहणार आहे. धारगळ आयुष रुग्णालयात सकाळी लवकर तपासणीसाठी गेल्यास सोनोग्राफी व रक्त तपासणी त्याच दिवशी करून घेता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच दोडामार्ग तालुका व शहर परिसरातील रुग्णांसाठी रविवार वगळता सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत खाजगी तपासणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
अधिक माहितीसाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर, सावंतवाडी यांच्याशी ९४२३४३५७६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
