You are currently viewing दोडामार्ग ते विजघर रस्त्यासाठी संदेश वरक यांचे साटेली भेडशी चर्च येथे उपोषण सुरू

दोडामार्ग ते विजघर रस्त्यासाठी संदेश वरक यांचे साटेली भेडशी चर्च येथे उपोषण सुरू

दोडामार्ग

दोडामार्ग ते विजघर रस्ता पूर्ण पणे डांबरीकरण व्हावा यासाठी अनेक उपोषणे व आंदोलने झालीत. मात्र हा रस्ता मधे मधे डांबरीकरण करण्यात येत आहे. या ३५ किलोमीटर रस्त्याचे मधे मधे डांबरीकरण न करता हा रस्ता संपूर्ण डांबरीकरण व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाला ६ फेब्रुवारी पर्यंत दोडामार्ग ते विजघर रस्ता संपूर्णपणे डांबरीकरण व्हावा अशी रस्ता पूर्ण करण्यासाठी डेटलाइन दिली होती.
मात्र हा रस्ता ६ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक आज साटेली-भेडशी चर्च समोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला नागरिकां कडून पाठिंबा दर्शवीला जात आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =