You are currently viewing श्री शिवतीर्थ इचलकरंजी बसस्थानकाचा कायापालट करणार : आम.प्रकाश आवाडे

श्री शिवतीर्थ इचलकरंजी बसस्थानकाचा कायापालट करणार : आम.प्रकाश आवाडे

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर पुनर्बांधणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकास साजेशे असा कायापालट केला जाईल, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.

आज शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आमदार प्रकाश आवाडे , मा. जि प सदस्य राहुल आवाडे यांच्यासमवेत बसस्थानक परिसराची पहाणी करून चर्चा केली. या बसस्थानककाची व परिसराची दूरवस्था झाल्याने दुरुस्तीसाठी यापूर्वी 2 कोटी रुपयांचा निधीस मंजूरी आणली होती . त्याशिवाय लागेल तितका निधी आणू असेही आमदार आवाडे यांनी सांगितले. हे काम मंजूर होईपर्यंत आमदार फंडातून ज्या सुविधा देता येतील त्या देऊ असेही ते म्हणाले.
इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानक हे इचलकरंजीसह नजीकच्या सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी मध्यवर्ती बसस्थानक आहे. इचलकरंजी व परीसर औद्योगिक दृष्ट्या अत्यंत गतीने विकसित होत आहे. त्यामुळे या बसस्थानकावर प्रवाशांची सतत मोठी वर्दळ होत असते. तसेच थोड्याच अंतरावर कोल्हापूर, सांगली व मिरज ही बसस्थानके असल्याने येथून विद्यार्थी व नोकरदार वर्गही तेथे दररोज ये-जा करीत असती. सद्यस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या किंवा सोयीच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना येथे उपलब्ध नसल्याने या बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच हातकणंगले तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्रामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांवर अनेक स्थानिकांचा रोजगार अवलंबुन असल्याने श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाची पुनर्बांधणी झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून पर्यायाने स्थानिक बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी इचलकरंजीतील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचें
बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्वावर पुनर्बांधणी करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज कोल्हापूर विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय इंजिनियर मनोज लिंगरज, आगर व्यवस्थापक सागर पाटील यांनी इचलकरंजी बसस्थानकाला भेट देऊन चर्चा केली.
यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, आनंदा दोपारे, चंद्रशेखर शहा, महादेव कांबळे, बाळासाहेब माने, सचिन हेरवाडे, नरसिंह पारिक, महावीर कुरुंदवाडे, अविनाश कांबळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =