You are currently viewing गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज; शहरात कृत्रिम विसर्जन कुंड, तलाव व मूर्तीदान केंद्रांची व्यवस्था

गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज; शहरात कृत्रिम विसर्जन कुंड, तलाव व मूर्तीदान केंद्रांची व्यवस्था

सांगली, कुपवाड व मिरज शहरातील विविध ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची सुविधा; नागरिकांनी कृत्रिम विसर्जन स्थळांचा वापर करण्याचे आवाहन

सांगली ( प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार )

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक व सुरक्षित गणेश विसर्जनासाठी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक नियोजन व तयारी पूर्ण केली आहे. सांगली, कुपवाड आणि मिरज शहरातील विविध भागांमध्ये कृत्रिम विसर्जन कुंड, कृत्रिम विसर्जन तलाव, विसर्जन विहिरी तसेच मूर्तीदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन सुलभतेने करता यावे तसेच जलप्रदूषण टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सवाची सांगता करता यावी, या उद्देशाने महानगरपालिकेने ही व्यवस्था केली आहे.

सांगली शहरात विसर्जनासाठी विविध ठिकाणी व्यवस्था : प्रभाग समिती क्र. १ अंतर्गत सांगली शहरातील विविध वॉर्डमध्ये खालील ठिकाणी विसर्जन कुंड, कृत्रिम विसर्जन व्यवस्था व नदीपात्रातील निर्धारित ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत—

सांगली कॉलेज कॉर्नर, चिंतामणी रिक्षा स्टॉप, जगदाळे प्लॉट, हनुमान मंदिर, साखर कारखाना गेट, घनःश्यामनगर, पवार मळा विहीर, आरोग्य केंद्र, संजयनगर १०० फुटी, आरोग्य केंद्र,

यश मंगल कार्यालयासमोर, संजयनगर :

स्वामी समर्थ घाट, पंचशील नगर चौक, त्रिशूल चौक, चिंचबाग मैदान,

संभाजी नगर परिसर : सरकारी घाट

विष्णू घाट, रणझुंजार चौक, पत्रकार नगर खुली जागा.

प्रभाग समिती क्र. १ अंतर्गत एकूण २३ विसर्जन व्यवस्था/ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

नागरिकांना गणेशमूर्ती दान करण्यासाठी खालील ठिकाणी मूर्तीदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे—सांगली कॉलेज कॉर्नर, चिंतामणी नगर, स्वामी समर्थ घाट चिंचबाग मैदान, त्रिशूल घाट, सरकारी घाट

प्रभाग समिती क्र. २ अंतर्गत विसर्जन व्यवस्था: सांगली शहरातील प्रभाग समिती क्र. २ अंतर्गत गणेशमूर्ती विसर्जनासाठी खालील ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे—सिताराम नगर – २ कुंड, जुने ट्रॅफिक ऑफिसजवळ – २ कुंड, vहिंदू–मुस्लिम चौक – २ कुंड शेत तळे, नेमिनाथ नगर, त्रिमूर्ती चौक – २ कुंड, मनपा शाळा क्र. ११ – १ कुंड

खुले नाट्यगृह, तानवडे प्लॉट – १ कुंड

श्री शिव मंदिर, स्फूर्ती चौक – २ कुंड जिल्हा न्यायालय, वानलेसवाडी – १ कुंड

या प्रभागात एकूण १४ विसर्जन व्यवस्था निश्चित करण्यात आल्या आहेत.

 

मूर्तीदान केंद्रे: नेमिनाथ नगर, सांगली, खुले नाट्यगृह, तानवडे प्लॉट

कुपवाड शहरातील वॉर्ड क्र. १, २, ८ व ९ मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, विसर्जन विहिरी तसेच मूर्तीदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कुपवाडमधील निर्धारित ठिकाणे : आंबा चौक, कुपवाड – ५ कृत्रिम तलाव, शेंडगे लाकूड वखार, वसंतनगर – विसर्जन विहीर मिरज रोड, ओढ्यालगत – विसर्जन विहीर यल्लम्मा मंदिर, जुना बुधगाव रस्ता – विसर्जन विहीर व १ कृत्रिम कुंड

खताळ नगर, कुपवाड – विसर्जन विहीरवृद्धाश्रमाजवळ, शारदानगर – १ कृत्रिम तलाव, वारणाली पाटबंधारे कार्यालयाजवळ – ४ कृत्रिम तलाव, सह्याद्रीनगर, दत्त मंदिराजवळ – १ कृत्रिम तलाव, समृद्धीनगर, सटाले मळा – १ कृत्रिम तलाव, आणखी निर्धारित ठिकाणी २ कृत्रिम तलाव

या सर्व ठिकाणी मूर्तीदान केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

मिरज शहरातील नागरिकांसाठी गणेशमूर्ती विसर्जनाकरिता गणेश तलाव व कृष्णाघाट ही नैसर्गिक विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

 

कृत्रिम विसर्जनाची ठिकाणे : गणेश तलावाजवळ, मिरज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज, रमा उद्यान, साईनंदन कॉलनी, मनपा खुली जागा, गाडवे चौक, विजापूर वेस, मिरज समतानगर, मिरज, गणेश मंदिर, टाकळी रोड, मिरज

मिरजमधील मूर्तीदान केंद्रे : गणेश तलावाजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, रमा उद्यान, साईनंदन कॉलनी, मनपा खुली जागा, गाडवे चौक, विजापूर वेस, कृष्णाघाट, समतानगर गणेश मंदिर, टाकळी रोड

 

गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन केल्यामुळे जलप्रदूषण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंड, कृत्रिम विसर्जन तलाव व अन्य निर्धारित विसर्जन व्यवस्थेचा वापर करावा.

तसेच ज्या नागरिकांना गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी मूर्तीदान करायचे आहे, त्यांच्यासाठी विविध ठिकाणी मूर्तीदान केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा.

गणेशोत्सवाची श्रद्धा व परंपरा जपत जलप्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम विसर्जन कुंड, कृत्रिम विसर्जन तलाव आणि मूर्तीदान केंद्रांचा वापर करावा. विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा