*चाकरमान्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत.!
*प्रवाशांनी मानले मंत्री नितेश राणे यांचे आभार; अजून एक मोदी एक्सप्रेस १३ सप्टेंबर रोजी मुंबई मधून सुटणार*
कणकवली :
गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतून कोकणात गावी येणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांसाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सोडण्यात आलेली मोफत ‘मोदी एक्स्प्रेस’ शुक्रवारी रात्री कणकवली रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी गणेशभक्त चाकरमान्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
सकाळी मुंबईहून सुटलेली मोदी एक्स्प्रेस रात्री कणकवलीत पोहोचताच ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करण्यात आला. रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांच्या स्वागतासाठी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक गणेशभक्त चाकरमान्यांनी “मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळेच आमचा गावी येण्याचा प्रवास सुखकर झाला,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोफत रेल्वेसेवेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, राकेश परब, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, नगरसेवक मेघा गांगण, संदीप सावंत, सदा चव्हाण, सर्वेश दळवी, स्वप्निल राणे, समीर प्रभुगावकर, नयन दळवी, प्रशांत राणे, लक्ष्मण घाडीगावकर, सागर राणे, प्रज्वल वर्दम, सुभाष मालंडकर, अभय गावकर, सचिन पारधिये, विजय चिंदरकर, औदुंबर राणे, प्रियाली कोदे, अनिकेत गुरव आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
