You are currently viewing मळगाव रेल्वेस्टेशन समोर दोन दुचाकींमध्ये धडक

मळगाव रेल्वेस्टेशन समोर दोन दुचाकींमध्ये धडक

तीन युवकांसह युवती जखमी : उपचारार्थ रुग्णालयात रवाना

सावंतवाडी
मळगाव स्थित सावंतवाडी रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावर हिरो होंडा स्प्लेंडर व या दोन दुचाकी मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन युवकांसह एक युवती जखमी झाली. स्थानिकांनी यातील दोघांना उपचारार्थ निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. तर दोन युवकांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गिरिष खांबल, सचिन पाटकर व अमित नाईक अशी जखमींची नावे असून तिघांना उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अंकिता गावडे नामक माजगाव येथील जखमी युवतीला निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यातील दोन युवक वेत्ये येथील असल्याची तर दोघे माजगांव येथील असल्याची माहिती उपसरपंच गुणाजी गावडे यांनी दिली असून त्यांनी जखमी युवकांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा