You are currently viewing भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांच्याकडून उंबर्डे विद्यालयाला खुर्च्या भेट…

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांच्याकडून उंबर्डे विद्यालयाला खुर्च्या भेट…

वैभववाडी

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांनी माध्यमिक विद्यालय उंबर्डे या शाळेला खुर्च्या भेट दिल्या आहेत. श्री लांजेकर या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यालयाला मदत केल्याबद्दल मुख्याध्यापक एस. एम. बोबडे यांनी त्यांचा सत्कार करत आभार मानले.
यावेळी श्री. लांजेकर म्हणाले, उंबर्डे विद्यालयाने अनेक रत्ने घडविले आहेत. या शाळेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. उज्वल यशाची परंपरा या शाळेची आहे. ती परंपरा यापुढेही कायम राहील असा माजी विद्यार्थ्यांना विश्वास आहे. गरीब गरजूंना शैक्षणिक मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले. विद्यार्थ्यांनी शाळेत मिळणाऱ्या सोयी सुविधांचा लाभ घ्यावा. ध्येय निश्चित करून अभ्यास करावा असे लांजेकर यांनी सांगितले.
यावेळी बाबालाल लांजेकर, मज्जित नंदकर, समीर चोचे, हमीद लांजेकर, रमजान चोचे, हमीद नाचरे, वाघमोडे सर, पवार मॅडम, नाईक सर, धर्मरक्षक जाधव, सुखदेव कोळी, शांताराम हीरोजी, गजानन गवस आदी उपस्थित होते. प्रास्ताविक एस.के. राठोड यांनी तर सूत्रसंचालन व्ही. जी. पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =