You are currently viewing ऐनारी गावची सुकन्या प्राजक्ता विचारे हिची पोलिस दलात निवड…

ऐनारी गावची सुकन्या प्राजक्ता विचारे हिची पोलिस दलात निवड…

वैभववाडी

तालुक्यातील ऐनारी येथील कु. प्राजक्ता श्रीकृष्ण विचारे हिची नुकतीच महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली आहे. तिच्या निवडीबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
प्राजक्ता ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील ऐनारी गावचे पोलिस पाटील आहेत. लहानपणापासूनच पोलिस दलात जाण्याचे निश्चित केले होते. तिने कोल्हापूर येथील एकलव्य करिअर अॕकॕडमी जॉईन केली होती. तिला तीन अपयश आले. अवघ्या एका मार्क्सनी तिची पोष्ट हुकली होती.
अखेर तिने जिद्द चिकाटीच्या जोरावर यश खेचून आणले. आणि महाराष्ट्र पोलिस दलात तिची नुकतीच निवड झाली. प्राजक्ता हिचे प्राथमिक शिक्षण ऐनारी येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण भुईबावडा येथे झाले तर उच्च शिक्षण वैभववाडी येथे झाले. तिने विज्ञान शाखेतून बीएसस्सी फिजिक्स मधून पदवी प्राप्त केली आहे.
नुकत्याच झालेल्या पोलिस भरती परीक्षेत प्राजक्ता हिने १५० पैकी १२५ गुण प्राप्त केले आहेत. यापुढे स्पर्धा परीक्षेतून क्लासवन अधिकारी होणार असल्याचे तिने यावेळी सांगितले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिची नवी मुंबई येथे पोष्टींग झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा