*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*श्रावण आणि मोर*
शहरात असं काही बघायला मिळणं अवघडच आहे.
पण गावाकडे विशेषत:गुजराथ, राजस्थान या प्रांतात जंगली विभागात खुप मोर दिसतात. नैसर्गिक अवस्थेत ऊन्मूक्त मानसिक अवस्थेत दिसतात.
हे मोर आणि श्रावण यांचे ही काही नाते असावे.
वर्षा ऋतूच मुळी या मोरांचा आवडता ऋतू.
जेष्ठात पाऊस फारसा नसतो आणि आषाढ संततधार कोसळते त्यामुळे सुरवातीला पहिल्या पावसात ते आनंदित होऊन नाचतात पण मग अति पावसामुळे वृक्षांवर तळ ठोकतात.
मोराचा रंग घननीळ आहे. चमकदार आहे. श्रावणही शामरंगी घननीळ मेघांचा आहे. श्रावणधार ही रिमझिम असते. मधुन मधुन झिम्माड सर येते. सारे ओलेचिंब होते. पण ऊन पावसाचा खेळ चालू असल्याने क्षणात सुवर्ण सांडून पानोपानी जलमोती चमकायला लागतात. वृक्ष वेली ऊन अंगभर माखुन सोनेरी होतात.
परत कधीही अचानक अंधारून येत पाऊसधारा बरसू लागतात.
मोरांना हे असे वातावरण फार आवडते. त्यात आभाळ भरलेले, वारा मजेत सुसाट सुटलेला, आणि क्षितिजावर छान सप्तरंगी इंद्रधनू.
मग काय. ‘सोने पे सुहागा’.
मोर आतुनच ऊचंबळून येत मोठ्यानी केकारव करत एकमेकांना साद घारतात. या झाडावरून त्या झाडावर हवेत पिसार लांबवत लोंबकळत मस्त ऊडून जातात. जमिनीवर ऊतरतात. एकीकडे जमिनीवरील सुकलेल्या पानाखालचे किटक खात छान नाचू लागतात.
मधुनच पिसारा पूर्ण फूलवत अक्षरश:विहंगम असा नजारा दाखवतात.
लांब सुंदर पाय छान ठेक्यात नाचवतात. घननीळ मान इकडे तिकडे नाजुकपणे रूबाबात हलवतात. डोळे चमकतात.आणि तो डोळ्या डोळ्यांचा हिरवट, निळा पिसारा मस्त पसरतात.
मगलांडोर आसपास असेल तर मनापासुन नाचतात.
बघत रहावे असे हे सुंदर रंगात नटलेले, मयुर नर्तन म्हणजे सौंदर्याची नजाकत आहे.
ताल सुद्धा चुकत नाही. कधी कधी वेडा झाला असेल तर खुप वेळा नाचत रहातो.
हे विहंगम सौंदर्य विशेषत :श्रावणात दिसतेच.
एरवी केकारव चालूच असतो.
पण श्रावणाचे सौंदर्य आणि तेच आवडणारा मोर आणि त्याचे सौंदर्य … देवाने अगदी सवड काढुनच मेहनत घेऊन सजवलेलं आहे.
अनुराधा जोशी.
9820023605
