सातारा :
ऐतिहासिक झाशीची राणी यांचे जन्मगाव असलेल्या धावडशी ( सातारा) या निसर्गरम्य गावातील श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल धावडशी ता .जि . सातारा येथे पुण्यातील ख्यातनाम महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या ३० साहित्यिक , कवी व कवयित्री यांनी सदिच्छा भेट दिली.
शाळेची गुणवत्ता, डिजिटल फलक ,बस सुविधा इंटरनेट सुविधा अध्ययन निष्पत्ती नुसार अध्यापन व शाळेच्या इतिहासाचा डिजिटल व्हिडिओ पाहून शाळेचे व संस्थाचालकांचे तसेच शिक्षकांचे कौतुक केले . विशेष म्हणजे महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी हे मुळ सातारकर असून धायरीकरांशी म्हणजे स्व. ऍडव्होकेट मनोहरपंत भागवत , स्व. डॉ. विठ्ठलराव पेंढारकर, स्व. जगूआण्णा पवार यांच्याशी तसेच ग्रामस्थांशी अत्यंत जवळचे ऋणानुबंध होते याचा आम्हाला अभिमान आहे असे उद्गार शाळेच्या अध्यक्षांनी काढले.
या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने प्रा.डॉ. महेंद्र ठाकुरदास ,मा श्री मिलिंद जोशी, बंडा जोशी, मकरंद घाणेकर , सुरेश शेठ, शुभदा उदगावकर, जयश्री श्रोत्रिय ,यशवंत देव, सुधीर बोकील, प्रमोद पिसाळ, प्रा गिरीश बक्षी, वंदना घाणेकर, त्र्यंबक बोरीकर , ॲड .पाचुणकर , शिंगवेकर सुधीर कुबेर, राजश्री सोले, व इतर मान्यवर कविवर्य उपस्थित होते .
शालाप्रमुख मा श्री सुनील चौधरी यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले .
संस्था विश्वस्त मा डॉ गिरीश पेंढारकर , डॉ . अभिराम पेंढारकर कुटुंबीय यांनी सर्वांचे पुष्प गुच्छ देऊन विनम्र स्वागत केले .
पंचायत समिती साताराचे सदस्य व संस्था सचिव मा प्रभाकर पवार (आप्पा) यांनी शाळेच्या भौतिक सुविधांबद्दल माहिती देऊन स्वागत केले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री कोरे सर यांनी संस्थापक कै डॉ विठ्ठलराव पेंढारकर व उपाध्यक्ष जगुआण्णा पवार यांच्या कार्याची कविता सादर केली .
महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तर्फे शाळेला ग्रंथालयासाठी पुस्तके सदिच्छा भेट म्हणून प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास विश्वस्त मा गणपत आप्पा पवार मा दिलीप बापू पाटील मा.श्री अशोक कापसे मा श्री आण्णासो पवार मा श्री संजय पवार संचालक महेश कोकीळ , शिक्षक आणि विद्यार्थी तसेच आदि ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते .
