You are currently viewing कळत नाही….

कळत नाही….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कळत नाही….*

उठा सकाळी लवकर म्हणता कंटाळा येतो
बेशिस्तीने इथेच मग हो पहा घात तो होतो…

सारे म्हणती उठा पहाटे तेच बरोबर आहे
खरे सांगते घोटाळा तर इथेच सारा होतो…

कोकिळ गातो भारद्वाज ही बागेमध्ये येतो
दोघांना बघुनी वाटते मी पांखरू होतो….

निश्चय करते उद्यापासूनी ब्रह्ममुहुर्तावरी
पुन्हा पहाटे पांघरूण पहा ओढूनी घेतो..

लवकर उठे लवकर निजे आरोग्य त्याला लाभे
सारे कळते पण न वळते मीच कोडगा होतो…

रामबाण “दवा”कोणी मला आणून देतो
उपकाराच्या ओझ्याखाली मी दबून जातो…

नियम करावे आणि पाळावे जरी पटे अंतरी
कारण कळत नाही का मीच हतबल होतो…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा