You are currently viewing परीक्षा

परीक्षा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*परीक्षा*

 

परीक्षाच ती जन्माआधी

मुलगी आहे की हो मुलगा

जीवनाच्या अस्तित्वावरच

उगारला जातो मग बडगा।।

 

आहार विहार शिक्षणात

परीक्षाच असते जीवनाची

त्याच्यापेक्षा तिची नेहमी

उपेक्षा होते कायमची।।

 

बुध्दीमत्तेने मात करते

जात असते पुढे पुढे

संस्काराचे जाळे भोवती

रुढी परंपरेचे पायी वेढे।।

 

माहेर सोडून सासरी येते

इथे परीक्षा मोठी असते

झिजते करते सगळ्यांसाठी

परी कुणी ना आपले असते।।

 

अपत्यप्राप्ती झाल्यानंतर

परीक्षेत यश मिळते आता

आनंदाचे अत्तर शिंपत

जीवन हसरे ठरते माता।।

 

सुखदुःखाचे उणे अधिक ही

बेरीज भागाकारही करते

उरले नाही कधीच काही

तेव्हा मात्र हातचा घेते।।

 

आयुष्याच्या परीक्षेत या

यश अपयशाशी लढत रहाते

वाट्याला पडती जे गुण ते

समजुतीतून मुकाट घेते…।।

 

 

🍃🍁००००००००००००००

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा