You are currently viewing डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी- पालवण येथे डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली (शिक्षक दिन) उत्साहात साजरा.

डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी- पालवण येथे डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली (शिक्षक दिन) उत्साहात साजरा.

डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी- पालवण येथे डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली (शिक्षक दिन) उत्साहात साजरा.

चिपळूण (प्रतिनिधी)

शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलाने झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या. सौ. अंजलीताई चोरगे मॅडम उपस्थित होत्या. तसेच सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांविषची आदरयुक्त भावना व्यक्त केल्या . तसेच प्रा. निर्मळ सर यांनी प्राध्यापक मनोगत व्यक्त करताना डॉ. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक कार्याचा व भारतीय शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षकांच्या समाज घडविण्यातील महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या. सौ. अंजलीताई चोरगे मॅडम यांनी शिक्षकांचे स्थान आपल्या जीवनात आई वडिलांनंतर अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु सानिया होवले व आभार प्रदर्शन कु सिद्धी खैर यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा