You are currently viewing शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात धूर फवारणी; आरोग्य निरीक्षक बी.एस. कांबळी यांची दमदार कामगिरी

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात धूर फवारणी; आरोग्य निरीक्षक बी.एस. कांबळी यांची दमदार कामगिरी

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात धूर फवारणी; आरोग्य निरीक्षक बी.एस. कांबळी यांची दमदार कामगिरी

शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब यांची मोलाची साथ; डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाची प्रभावी उपाययोजना

शिरोडा :

प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी अंतर्गत, शिरोडा ग्रामपंचायत आणि जिल्हा हिवताप कार्यालय, ओरोस यांच्या निरीक्षणाखाली शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात धूर फवारणी करण्यात आली. डासांचा प्रादुर्भाव तसेच हिवतापासारख्या आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली.
या धूर फवारणीच्या मोहिमेत आरोग्य निरीक्षक बी. एस. कांबळी उर्फ पप्या कांबळी यांनी सक्रिय सहभाग घेत प्रभावीपणे कामकाज पार पाडले. त्यांना शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब यांनी मोलाची साथ दिली.
यावेळी डॉ. विवेक कदम, डॉ. विक्रांत सावंत, आरोग्य सहाय्यक साईनाथ वेटे, आरोग्य सेवक बी. आय. तांबोसकर, रेडकर तसेच शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि शिरोडा ग्रामस्थ उपस्थित होते.
रुग्णालय परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांनीही परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे आणि आरोग्य विभागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा