You are currently viewing श्रीकृष्णाचा पाळणा

श्रीकृष्णाचा पाळणा

*आम्ही सिद्ध लेखिका साहित्य समूहाच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

श्रीकृष्णाचा पाळणा

 

श्रावणमास पर्जन्यधारा

बंदिवासात चैतन्य झरा

बाळकृष्ण तो घेई अवतारा

जो बाळा जो रे जो…..!!

 

माध्यान्ह रात्री रूप सावळे

देवकी पोटी बाळ सानुले

बाळरूप ते गोड हासले

जो बाळा जो रे जो…..!!

 

तुटले पाश भंगली यमुना

नंद यशोदेचा लाडका कान्हा

सुखरूप गेला गोकुळी सदना

जो बाळा जो… रे… जो….!!

 

गायी वासरे दही दूध लोणी

गोपींचा प्रिय घाली मोहिनी

अन्यायाला न्याय देई मिळवुनी

जो बाळा जो… रे..‌ जो…..!!

 

खोड्या करिसी मित्र जमुनी

गोपिका गुंग पावा ऐकुनी

विसरते भान राधारमणी

जो बाळा जो …रे… जो….!!

 

सांगतो तत्व एकत्र राहू

मिळुनी राहू मिळुनी खाऊ

आस्था माया‌प्रेम आनंदे पाहू

जो बाळा जो… रे… जो…..!!

 

भगवतगीता सांगे जगाला

लाभला अर्थ मानव जन्माला

योगेश्वर कृष्ण जोजवू त्याला

जो बाळा जो… रे …जो……!!

 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

अरुणा दुद्दलवार✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा