You are currently viewing मच्छिमारांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार..

मच्छिमारांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार..

मालवण :

मच्छीमाराना जाहीर झालेल्या मत्स्य पॅकेज मधील जाचक अटी शिथिल करण्यात आमदार वैभव नाईक यांनी महत्वाची भूमिका बजावत मच्छीमाराना न्याय दिला आहे. असे सांगत मालवण येथे मच्छीमारांच्या वतीने आमदार नाईक यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांचेही मच्छीमारांनी विशेष आभार मानले आहेत.

 

यावेळी मत्स्य विक्रेत्या महिला, मच्छिमार व्यावसायिक, ट्रॉलर मालक संघटना मालवण यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. शिधापत्रिका नुसार एक सभासद लाभ ही अट राज्य शासनाने शिथिल केल्याने जास्तीत जास्त जणांना लाभ मिळणार आहे. याबाबत ट्रॉलर मालक संघटना अध्यक्ष विकी चोपडेकर यांनी आभार मानले.

 

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहर प्रमुख बाबी जोगी, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये, सेजल परब, संमेश परब, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, बाळू नाटेकर, दीपा शिंदे, स्वप्नील आचरेकर, संतोष खंदारे यासह अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 14 =