You are currently viewing मसुरे कावावाडी मसूरकर जुवा येथे भवानी मातेचा गोंधळ 17 ते 20 मे रोजी..

मसुरे कावावाडी मसूरकर जुवा येथे भवानी मातेचा गोंधळ 17 ते 20 मे रोजी..

मसुरे :

 

मसुरे कावावाडी येथील मसूरकर जुवा येथे श्रीदेवी आई भवानी मातेचा गोंधळ उत्सव दिनांक 17 ते 20 मे या कालावधीत मसुरकर परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दिनांक 17 मे रोजी दुपारी 12:30 वाजता ब्राह्मण भोजन महाप्रसादचे आयोजन केले आहे.

दिनांक 19 मे रोजी सकाळी आठ वाजता होम हवन, दुपारी 1 वाजता महाप्रसाद तसेच दिनांक 20 मे रोजी भवानी मातेचा गोंधळ उत्सव, सायंकाळी 5 वाजता जोगवा, सायंकाळी 7 वाजता देवीचा मांड, रात्री 8 वाजता महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही संपन्न होणार आहेत. तरी भवानी मातेच्या गोंधळाचा लाभ घेण्याचे आवाहन मसूरकर परिवारातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा