You are currently viewing केसरीत भाजप पदाधिकाऱ्यांसह रवींद्र चव्हाण यांनी ऐकली ‘मन की बात’
Oplus_16908288

केसरीत भाजप पदाधिकाऱ्यांसह रवींद्र चव्हाण यांनी ऐकली ‘मन की बात’

केएसआर ग्लोबल एक्वेरियममध्ये ‘मन की बात’च्या १३७व्या भागाचे थेट प्रक्षेपण

सावंतवाडी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या १३७व्या भागाचे थेट प्रक्षेपण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आपल्या केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियम येथे पाहिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प, युवकांसाठी नशामुक्त भारताचा महत्त्वाचा संदेश देत समाजहिताशी निगडित विविध विषयांवर देशवासीयांना मोलाचे मार्गदर्शन केले.

केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियम येथे मोदीजींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदीजींचे विचार ऐकले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या कोलगाव मतदारसंघाचे माजी सदस्य मायकेल डिसोझा, सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, भाजप आंबोली मंडळ युवा मोर्चाचे अध्यक्ष विनेश तावडे आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आत्मीयतेने ऐकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक असून, ‘मन की बात’ हा उपक्रम सामान्य जनतेशी थेट जोडणारा संवाद ठरत असल्याचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा