ईद-ए-मिलाद निमित्त बोर्डवे मुस्लिम वाडी जुम्मा मशीद द्वारे
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
कणकवली
बोर्डवे येथे ईद-ए-मिलादूनबी जलसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व नात-ए-मुस्तफा चा कार्यक्रम घेण्यात आला
दरवर्षीप्रमाणे यंदाही बोर्डवे जुम्मा मस्जिद ट्रस्ट तर्फे बोर्डवे मुस्लिम वाडी येथे छोट्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी अॅड. अशपाक शेख, हाफिज सोहेल फैजान शेख, मोहसीन शेख, मौलाना आलम, कुतुबुद्दीन शेख, आसिफ शेख इत्यादी उपस्थित होते. तसेच मुजफ्फर शेख, जाकीर दुदली, आफताब शेख, बशीर शेख, अनवर शेख, इकबाल पटेल यांचीही विशेष उपस्थिती राहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना आयास शेख यांनी केले
