*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम भावगीत*
*माझी लेक लाडकी साजिरी*
डोळ्यांच्या निरंजनात तेवती आठवणींच्या वाती
मायेच्या या कौतुकाची ओढ सजली मनाच्या काठी ||धृ ||
तू उमलती गुलाबकळी तू अवखळ उनाड वारा..
गंध पंखुडीत भ्रमरापरी तुझ्या खोडकर आठवांच्या धारा..
हळुवार ओठावर स्मृतीची पाखरे गाणी गाती…
मायेच्या या कौतुकाची ओढ सजली मनाच्या काठी….||1||
चाफा फुलला चाफा बोलला दरवळला सुगंध..
तुझा गोड किलबिलाट घरात नांदतो आनंद…
ताईची ग तू प्रतिकृती साजरा अनमोल मोती…
मायेच्या या कौतुकाची ओढ सजली मनाच्या काठी….||2||
कोडींगच्या मायाजालात गुंफसी बुद्धीचे हे रंग…
तुझ्या उत्तुंग यशाने उमलती आनंद तरंग…
आकाशाच्या त्या पार जाता शोभे तारकांत ही ज्योती…
मायेच्या या कौतुकाची ओढ सजली मनाच्या काठी..||3||
डोळ्यांच्या निरांजनात तेवती आठवणींच्या वाती
मायेच्या या कौतुकाची ओढ सजली मनाच्या काठी….||धृ||
सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
7066998796
