वेंगुर्ले नगरपरिषदेचा देशात १५ वा क्रमांक
स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेचा देशात १५ वा क्रमांक.

वेंगुर्ले नगरपरिषदेचा देशात १५ वा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेचा देशात १५ वा क्रमांक,

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात वेंगुर्ला नगरपरिषदेला देश पातळीवर १५ वा व महाराष्ट्रात १२ क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यापूर्वी देशामध्ये थ्री स्टार रँकिंगमध्ये (कचरामुक्त शहर) न.प.ला पहिल्या १२ मध्ये स्थान मिळाले होते. तसेच वेंगुर्ले शहराला ओडीएफ ++ चा दर्जा मिळालेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशात १५ वा क्रमांक आल्याने स्वच्छ सर्वेक्षण १८ व १९ मध्ये शिल्लक राहिलेली बक्षिसाची ५० टक्के सव्वासहा कोटी रुपये रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात पहिल्या ३ क्रमांक मिळविण्याचा मानस असल्याचे यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा