You are currently viewing महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री डॉ. दक्षा पंडित लिखित अप्रतिम षडाक्षरी काव्यरचना*

 

*महाराष्ट्र दिन*

 

माझा महाराष्ट्र

जननी शौर्याची

शिवाजी,संभाजी

बाजी धाडसाची……१

 

एक मेस झाली

राज्याची स्थापना

मराठीपणाची

करूया गर्जना……२

 

महाराष्ट्र दिनी

पावले तादात्म्य

रक्त सांडूनिया

वीरांना हौतात्म्य……३

 

मराठी वीरांनी

केले बलिदान

मराठी अस्मिता

आम्हा अभिमान……४

 

ज्ञानेशाची ओवी

तुक्याचे अभंग

मोरोपंती आर्या

वैखरी अखंड……५

 

वैभव संपन्न

महाराष्ट्र देशा

वारे प्रगतीचे

उंचावती आशा……६

 

मराठी मातीत

असतो ओलावा

परप्रांती ह्यांस

मिळतो विसावा……७

 

मराठी संस्कृती

दिसे विविधता

नद्या, पर्वंतांची

येथे विपुलता…..८

 

महाराष्ट्र राज्य

देशाचे भूषण

शौर्य,धैर्य गाथा

देतसे स्फुरण……९

 

थोर विभुतींनी

ठेविला आदर्श

प्रयत्न तयांचे

मिळाले सुयश……१०

 

महाराष्ट्र माझा

आहे अग्रेसर

कुठलाही प्रांत

किर्ती दिगंतर……११

 

संत मांदियाळी

देशा भुषवित

शिकवण त्यांची

आणूया कृतित…..१२

 

डॉ दक्षा पंडित

दादर,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा