You are currently viewing जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नानेली गावात वृक्षारोपण..

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नानेली गावात वृक्षारोपण..

कुडाळ :

आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नानेली ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.

यावेळी नानेली गावचे सरपंच, नानेली ग्रामस्थ व कुडाळ वनविभागाचे वनक्षेत्रपाल  मा. अमृत शिंदे, माणगाव वनपरिमंडळ अधिकारी श्री. सुनील सावंत, माणगाव वनरक्षक  श्री. बाळराजे जगताप, वाडोस वनरक्षक, वनरक्षक कालेली परिमंडळ स्टाफ आदी उपस्थिती होते.

यावेळी परिमंडळ माणगाव वनक्षेत्रांमध्ये स्वयंस्फूर्तीने व लोक सहभागातून वनक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य स्वरूपात फळे उपलब्ध होणे या दृष्टिकोनातून वनक्षेत्रात आंबा, फणस, कोकम, काजू, जांभूळ, आदी फळझाडांचे बीजारोपण केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा