You are currently viewing सावंतवाडी पंचायत समितीत होणार “खांदेपालट”…

सावंतवाडी पंचायत समितीत होणार “खांदेपालट”…

मानसी धुरींचा राजीनामा ; निवड होईपर्यंत शितल राऊळ प्रभारी सभापती…

सावंतवाडी,

येथील पंचायत समितीत सभापती व उपसभापती पदाचे खांदेपालट होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान सभापती मानसी धुरी यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे प्रभारी सभापती पदाची जबाबदारी उपसभापती शितल राऊळ यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान लवकरच ही निवड प्रक्रिया लवकरच होणार आहे. याबाबत काल या ठिकाणी झालेल्या जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. आता या ठिकाणी सुनंदा राऊळ तसेच प्राजक्ता केळुसकर यांचे नाव चर्चेत आहे.
दरम्यान उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया सभापतीपदाची निवडणूक झाल्यानंतर केली जाणार आहे. त्या ठिकाणी बाबू सावंत यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे नेमकी कोणाच्या गळ्यात ही माळ पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 15 =