You are currently viewing बांद्यातील रिक्षा चालकांना  सावंतवाडी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांच्या वतीने  मास्क, पाणी बॉटल व न्याहरी वाटप…

बांद्यातील रिक्षा चालकांना सावंतवाडी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांच्या वतीने मास्क, पाणी बॉटल व न्याहरी वाटप…

बांद्यातील रिक्षा चालकांना सामाजिक जाणीवेतून राष्ट्रवादी उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या हस्ते मास्क वाटप व पाणी बॉटल,न्याहरी व्यवस्था करण्यात आली. कोरोना व्हायरस मुळे सध्या रिक्षा व्यवसाय मंदावला आहे. त्याही परिस्थितीमध्ये रिक्षा व्यवसायिक आपली सेवा प्रवाशांना देत आहेत. सदर रिक्षा चालक स्वतः जीव धोक्यात घालुन प्रवासी व रुग्णांना सेवा देत आहे.

यासाठी सावंतवाडी राष्ट्रवादी च्या पदाधिकारी यांनी बांदा येथे येत बांदा बस स्डँन्ड मधील रीक्षा चालकांना मास्क वाटप व न्याहरी व्यवस्था देत एक सामाजिक उपक्रम साजरा केला. यावेळी युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजू धारपवार, युवक राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड, युवक राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष अर्षद बेग, अल्पसंख्याक राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू,राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष कौस्तुभ नाईक, संतोष जोईल,सोहेल शेख, आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा