You are currently viewing चिपी विमानतळ हे काँग्रेसचेच यश!

चिपी विमानतळ हे काँग्रेसचेच यश!

मोपाला महत्व देऊन चिपीचे खच्चीकरण करण्याचा डाव काँग्रेसनेच हाणून पाडला

मालवण

मागील १५ वर्षा पासून नियोजित व आज प्रगतीपथावर असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ होण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारनेच प्रयत्न केले आहेत. या विमानतळासाठी केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यावेळी आवश्यक त्या परवानग्या दिल्या होत्या. दोडामार्ग नजीक मोपा विमानतळाला अधिक महत्व देऊन चिपीचे महत्व कमी करण्याचा होणारा प्रयत्नही काँग्रेसनेच हाणून पाडल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.

याबाबत श्री. मोंडकर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने व गोवा विमानतळाला एकमेव पर्याय म्हणून चिपी विमानतळाला तत्कालीन कॉंग्रेस सरकारनेच जागा निश्चिती करत व त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक काहीश्या त्रुटी दूर करत परवानग्या दिल्या होत्या. हे चिपी विमानतळ उभारणीसाठी एका कंपनीला नेमण्यात आलं. त्यानंतर जिल्ह्यातील तत्कालीन युती सरकारच्या काही नेत्यांनी व सध्याच्या केंद्रातील सत्ताधारी आजी माजी मंत्री महोदयांनी आपापल्या मतमतांतरात हेव्यादाव्यात या विमानतळाचा विकास ताटकळत ठेवला होता.आपापल्या सोयी तारखा ठरवत त्यानुसार तिथे खाजगी विमान आणून एकेदिवशीय कार्यक्रम करून या जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा भंग केल्या होत्या. याचा निषेध म्हणूनच दोन वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून कागदी व खेळण्यातील विमान उडवून आम्ही निषेध व्यक्त केला होता. आता सुद्धा या विमानतळ ठिकाणी लाईट, पाणी व रस्ते पूरक स्वरूपात पोचले नसून अजून काही महिने या साठी वाट पहावी लागणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक निधी विद्यमान बांधकाम मंत्री माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेला असून मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्ग यांचं या कामी कटाक्षाने लक्ष असून रस्ता रुंदीकरण साठी प्राधान्य देत आहेत

काही जणांनी चिपी होऊ नये व दोडामार्ग येथील विमानतळ लवकर व्हावं त्यासाठी देखील प्रयत्न केले व चिपीच्या मर्यादा देखील कमी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु राज्यात काँग्रेसच्या समन्वयातुन आघाडी सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा या विमानतळाच्या उर्वरित कामासाठी लागणारा वाढीव निधी देऊन या विमानतळ निर्माण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. सध्या या ठिकाणी लागणाऱ्या सुविधा पूर्ण स्वरूपात होण्यासाठी अजून किमान एक वर्ष तरी लागणार असून या ठिकाणी कुडाळ हुन कवटी मार्गे जाणारा रस्ता देखील लवकरच रुंदीकरण करण्यासाठी घेण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे वेंगुर्लेहून येणारा रस्ता हा पाट- परुळे व काही भागात अरुंद असून त्यांचा ही विस्तार करण्यात येणार आहे. या जिल्ह्याच्या विकासा साठी विमानतळ होणं गरजेचं असल्याने या ठिकाणी नागरिकांची गरज पाहता भविष्यात देखील काँग्रेस पक्ष या जिल्ह्यातील नागरिकां सोबत विकासासाठी उभा आहे.

सध्या या विमानतळ उदघाटन बाबतच्या सर्व चर्चा या फक्त आपापसतील हेवेदावे दिखावा म्हणून न राहता यावर सर्व नेत्यांनी एकत्र येऊन कायम स्वरूपात तोडगा काढून या ठिकाणी दररोज विमान उड्डाण व्हावीत यासाठी प्रयत्न करावेत व त्यासाठी लागणाऱ्या सुविधा देखील तत्काळ पुरविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या विमानतळ देखभाल करण्यासाठी जो कर्मचारी वर्ग भरती केला जाईल त्यात जिल्ह्यातील स्थानिक युवकांना देखील प्राधान्य देण्यात याव या साठी संबंधित कंपनीला आम्ही पत्र देखील दिले आहे. हे विमानतळ नियमित चालू झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार असल्याने फक्त श्रेयवादा साठी उदघाटन न करता कायमस्वरूपी विमान उडेल याच नियोजन या सर्व नेत्यांनी कराव, अशी अपेक्षा श्री. मोंडकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा