*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भलत्यावरचं हात उगारता….!!*
*एकच न्याय…..!!!*
सजीव कातडी पांघरून
कशाला चिंतन करता
निरर्थक गाथा प्रसवत
भलत्यावरचं हात उगारता..!
अग्रणी नखे दिलीत
कशाला बोथडं करता
दोन हात करा..हातानों
हात खाली…का..घेता..!
शासनाला आई नसते
कशाला ओक्साबोक्शी रडता
गुन्हेगार तुमच्याच सभोवती
न्याय कशाला मागता..!
सारा प्रदेशचं तुमचा
कशाला भीतीच्या छायेत..वावरता
किती काळ..वाट पाहणार
पेटवा त्यांची.. चिता आता..!
तेही ..चालून येतील
कशाला संधी देता
पापाचा अंत करायला
वाट कोणाची पाहता..!
संपवा एकदाचं ..पाप्यांना..
नरकात पाठवा ..त्यांना..
माताभगिनींवर अत्याचार करणा-यांना
फासावर चढवा आरोपींना..
न्याय एकचं !मारून टाका नराधमांना
न्याय एकचं!मरेपर्यंत……फाशी
सिर्फ मौत..सारे दुनियाके सामने..
बाबा ठाकूर
