वाढीव वीज बिलांबाबत भाजप कडून ठाकरे सरकारचा निषेध

वाढीव वीज बिलांबाबत भाजप कडून ठाकरे सरकारचा निषेध

वाढीव वीज बिलाबाबत कणकवलीत भाजपचा एल्गार ठाकरे सरकारचा केला निषेध

कणकवली / प्रतिनिधी :-

सरकार जनसामान्यांची पिळवणूक करत असल्याचा केला आरोप. सत्ताधारी महाविकास आघाडीचा निषेध असो…… ठाकरे सरकार हाय हाय….. भरमसाठ वीज बिले मागे घ्या… वाढीव विज बिल आकार कमी करा अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात. कोरोना साथरोग काळातच वाढलेले वीजबिले माफ करावी यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कणकवलीतील कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. त्यासंबंधीचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना यावेळी देण्यात आल.

यावेळी उपस्थित भाजप कणकवली मंडळ अध्यक्ष राजन चिके संतोष कानडे वैभववाडी मंडल अध्यक्ष नासीर काझी देवगड मंडल अध्यक्ष रवी पाळेकर भालचंद्र साठे समाज कल्याण सभापती शारदा कांबळे वैभववाडी माजी उपसभापती हर्षदा हरियाणा रमेश पावसकर बुलंद पटेल मिलिंद मेस्त्री संदीप मेस्त्री पप्पू पुजारी बबलू सावंत राजू पेडणेकर सुशील सावंत प्रकाश पारकर अण्णा कोदे आदी उपस्थित होते. दरम्यान लॉग डाऊन मध्ये गेले सहा महिने घरात बसून काढावे लागल्याने हातावर पोट असलेल्या आणि पगारावर अवलंबून असलेल्या सर्वांची दमछाक झाली आहे.

लॉक डाऊन काही अंशी कमी असले तरी अजूनही अनेकांची रोजीरोटी सुरू झाली नाही. गाठीशी असलेला थोडाबहुत पैसाही संपत आलेला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात उपासमारीची भीती डोकावत आहे. किंबहुना घर भाडे भरता आले नाही नाही आणि वीज बिले भरता येत नाही. वीज दरवाढीबाबत आधीपासूनच लोकांच्या मनात नाराजी आहे.त्यातच रोजीरोटी सुरू नसताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा अशी चिंता मनात असताना वीज बिले भरण्याचा तगादा चालू आहे.

त्यामुळे लोकांमधील असंतोष वाढत चालला आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्य वीज नियामक कायद्यातील कलम 4 चा वापर करून तातडीने सर्व वीज देयकाना स्थगिती देऊन 300 युनिटपर्यंत वीज वापर करणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील सहा महिन्यांची वीज देयके माफ करावी.केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी च्या पॅकेजमध्ये सर्व राज्याच्या वीज वितरण कंपनी ना 90 हजार कोटीचे अर्थसहाय्य जाहीर केलेले आहे. यातील सुमारे तीन हजार कोटी रुपये राज्य सरकार वीज वितरण कंपनीकडे जमा झालेले आहेत. यामुळे राज्यातील जनतेची 300 युनिटपर्यंत यांची वीज बिल माफ करणे सहज शक्य आहे. त्यामुळे आमची असलेली वीज बिले माफ करण्याची मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा