You are currently viewing कलमठमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून ४१ घरकुलांना मंजुरी

कलमठमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून ४१ घरकुलांना मंजुरी

कलमठमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून ४१ घरकुलांना मंजुरी

बेघर लाभार्थींना दिलासा; भूमिहीनांसाठी जमीन प्रस्ताव लवकर पूर्ण करण्याचा सरपंच संदीप मेस्त्री यांचा विश्वास

कणकवली :

तालुक्यातील कलमठ गावातील बेघर लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेतून नव्या आर्थिक वर्षात तब्बल ४१ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी झालेल्या कलमठ ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत मंजूर घरकुल लाभार्थी यादीचे वाचन करण्यात आले.
कलमठ ग्रामपंचायतीने गेल्या वर्षी बेघर व भूमिहीन गरजू लाभार्थींसाठी एकत्रित घरकुल प्रकल्प पूर्ण केला होता. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय जमीन योजनेतून भूमिहीन लाभार्थींना जमीन मिळण्यासाठी आवश्यक अनुदानही प्राप्त केले होते.
यावर्षी प्रधानमंत्री आवास योजनेतून नव्याने मंजूर झालेली घरकुले वेळेत पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. भूमिहीन लाभार्थींच्या जमिनीचे प्रस्ताव लवकरात लवकर तयार करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास सरपंच संदीप मेस्त्री यांनी व्यक्त केला.
गावातील सर्व मंजूर घरकुले लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी मेहनत घेतील, असेही सरपंच मेस्त्री यांनी सांगितले.
दरम्यान, कलमठ गावातील गरजू लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुले मंजूर झाल्याबद्दल गावाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपसरपंच रवींद्र यादव, स्वप्नील चिंदरकर, दिनेश गोठणकर, नितीन पवार, हेलन कांबळे, सचिन खोचरे, स्वाती नारकर, प्रियाली आचरेकर आणि श्रेयस चिंदरकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा