*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. संध्या कुलकर्णी यांची स्वादिष्ट पाककृती*
*कांचीपुरम इडली*
*साहित्य*:
३ वाट्या तांदूळ,१ वाटी उडीद डाळ, मीठ, थोड्या मेथ्या, दोन वाटी चुरमुरे, तेल, उडीद डाळ, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद, आल्याचा कीस, कोथिंबीर, सुक्क खोबरं
*कृती_:*
डाळ तांदूळ मेथ्या सात-आठ तास भिजत टाकावे .त्यानंतर हे सर्व वाटताना त्यात भिजवलेले चुरमुरे टाकून बारीक वाटून सात आठ तास पीठ आंबण्यासाठी ठेवून द्यावे. पीठ आंबले की त्यामध्ये मीठ, आल्याचा कीस ,थोडं सुख खोबरं, कोथिंबीर घालून ठेवावे, त्यानंतर व र सांगितल्याप्रमाणे उडदाची डाळ घालून किंवा तुम्हाला हवी असेल तर हरभऱ्याची डाळ घालून नेहमीप्रमाणे फोडणी करून ती ह्यात घालावी. छान फेटून मग नेहमीप्रमाणे इडल्या करून घ्याव्यात. झाल्या कांजीपुरम इडल्या तयार…
*टीप* पीठ आमले असेल तर त्यात सोडा टाकायची अजिबात गरज नाही, इडल्या मस्त स्पोंजी होतात.
२) यात तुम्ही गाजर कोबी अशा काही भाज्या तुम्हाला हव्या असतील त्या किसून घालू शकता लहान मुलांसाठी तर उत्तमच..
सौ. संध्या कुलकर्णी, सातारा
