कोरोना साखळी तोडण्यासाठी शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवावी

कोरोना साखळी तोडण्यासाठी शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवावी

कोरोना साखळी तोडण्यासाठी शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवावी – समिर रेडकर

दोडामार्ग / सुमित दळवी :-
दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला असून मागच्या दोन दिवसात शहरात पाच रुग्ण आढळले तर आज तब्बल आठ रुग्ण आढळल्याने तालुक्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे कोरोना साखळी तुटावी यासाठी दोडामार्ग शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समिर रेडकर यांनी केली आहे.
गेले दोन दिवस दोडामार्ग बाजार पेठेतील गोवा रोड वरील दुकाने बंद ठेवण्यात आली असून आता तर कोरोना सारख्या विषाणू आपला विळखा घट्ट करत असून असाच कोरोनाचा थैमान वाढत राहिल्यास दोडामार्ग शहरास व तालुक्यास धोका निर्माण होवू शकतो आणि हा धोका टाळण्यासाठी दोडामार्ग बाजारपेठ बंद करणे आवश्यक असल्याने बाजारपेठ बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते समिर रेडकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा