टोलनाका सुरू करण्यापूर्वी महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोलमाफीसह स्वतंत्र लेनची मागणी
कणकवली
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता, येत्या दोन ते चार दिवसांत टोलनाका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित कंपनीच्या वतीने देण्यात आली.
मात्र, महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना टोल आकारणी सुरू करू नये, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण काम सुरू झाल्याशिवाय टोल आकारणी करू नये, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.
तसेच सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र टोल लेन उपलब्ध करून द्यावी, अशीही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
या सर्व मागण्यांबाबत प्रशासन व संबंधित कंपनीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर सर्वांच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
