You are currently viewing देवगड जामसंडे नगरपंचायत ला ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त

देवगड जामसंडे नगरपंचायत ला ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त

देवगड

देवगड-जामसंडे नगरपंचातीला ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त झाल्यामुळे देवगड-जामसंडे शहराच्या विकासामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वच्छतेबाबत हा दर्जा दिला जातो.सलग तिन वर्षे हा दर्जा देवगड-जामसंडे नगरपंचायतीला मिळाला आहे. देवगड-जामसंडे शहराची आता विकासात्मक दर्जाकडे वाटचाल सुरु असून यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी तसेच कर्मचारी व ग्रामस्थांचा देखील वाटा आहे. स्वच्छतेविषयक दरवर्षी केंद्र शासनाकडून मानांकन दिले जाते.गेली तिन वर्षे सातत्याने देवगड-जामसंडे नगरपंचायतीला ओडी़एफ प्लस हा दर्जा दिला जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून देवगड-जामसंडे नगपंचायतीने अनेक उपक्रम राबविले असून ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरुन करुन त्यांची खत निर्मिती देखील केली जाते. दिल्लीच्या केंद्र स्तरीय कमिटीने नुकतीच देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या हददीतील स्वच्छता विषयक पाहणी करुन या कमिटीच्या परिक्षनानंतर ओडीएफ दर्जा देण्यात आला आहे. अशी माहिती नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 14 =