You are currently viewing विनयभंगप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला

विनयभंगप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला

सिंधुदुर्गनगरी

कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले सिंधुदुर्गचे जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला.याकामी सरकारी पक्षाचे वकील रुपेश देसाई यांनी काम पाहीले. हा प्रकार १८ फेब्रुवारीला घडला होता.याप्रकरणी किरकोळ कारणावरून चव्हाण यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता.त्यानुसार श्रीमंत चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी आपल्याला अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात यावा,अशी मागणी जिल्हा न्यायालयाकडे केली होती. मात्र आता त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 6 =