आरोंदा येथील देवी सातेरी भद्रकालीचा १० मे ला वर्धापन दिन….
बांदा
आरोंदा येथील श्री देवी सातेरी भद्रकाली देवीचा २६ वा वर्धापन दिन सोहळा १० मे ला साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. यजमान देहशुद्धी, प्रायश्चित्त विधी, देवता प्रार्थना, गणपती पूजन, संभारदान पूर्वक स्वस्तिवाचन, आचार्यदिवरण, प्राकार स्थलशुद्धी, श्री देवी सातेरी भद्रकाली षोडशोपचार, पूजा व ग्रहपूजन व ग्रहयजन, उत्तरांग होम, दुपारी १२ वा. बलिदान पूर्णाहुती, अभिषेक, सार्वजनिक प्रार्थना, महानैवेद्य आरती होणार आहे. सकाळी ८ ते १२ पर्यंत कुंकुमार्जन, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. पार्सेकर दशावता नाट्य मंडळ यांचा ट्रिकसिनयुक्त “पातळकंद गणेश दर्शन” नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी भद्रकाली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती आरोंदा मानकरी व ग्रामस्थ यांनी केले आहे.