आकाश मिल व फिश ऑइल प्रा. लि.च्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ रक्तदात्यांचे रक्तदान
केळूस (वेंगुर्ला) येथील कारखान्यात दरवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन
वेंगुर्ला
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत आकाश मिल व फिश ऑइल प्रा. लि.च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. केळूस (ता. वेंगुर्ला) येथील कंपनीच्या कारखाना परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिरात एकूण २५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी मोलाचे योगदान दिले. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. या भावनेतून अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाने, अधिकारी, कर्मचारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांचे आभार मानले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार कंपनीतर्फे व्यक्त करण्यात आला.
