सावंतवाडी :
शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा तरुण, तडफदार आणि झुंजार युवा नेतृत्व दिनेश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी, २२ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यासह आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शेतकऱ्यांना खत वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण, वृक्षारोपण तसेच अन्य लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दिनेश गावडे मित्र मंडळाकडून नियोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांना शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका शिवसेना पदाधिकारी आणि दिनेश गावडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
